दिव्य संदेश
आत्मकल्याण संत सत्पुरुष यांच्या विचारातूनच साधु शकते समाज संतांच्या दिव्य विचाराशी समरस होत नाही तो पर्यंत समाजात आत्महिताची दिशा मिळणे अतिकठीण आहे ती यथार्थ दिशा विûवातील संपूर्ण मानव जातीला मिळावी मग तो कोणत्याही जातीधर्मपंथाचा असो कारण संत कोणाचाही भेदभाव करीत नाहीत त्यांच्या विचारात द्वैत नसल्यामुळे भेदाचा प्रश्नच उपस्थित होत नाही ते सर्वांना आपपर भावरहित दृष्टीनेच पाहतात सत्पुरुषांचा दृष्टीकोनच सर्वांठायी ईश्वरत्त्व व समत्त्व पाहण्याचा असतो समोऽहं सर्वभूतेषु किंवा ईश्वर सर्वभूताना या गीतोत प्रमाणे सर्वत्र ईश्वर हा परमात्त्माच आहे असे ते अनुभवतात