!!...Jay Gurudev...!! HARIDWAR YATRA 14 APRIL TO 21 APRIL 2025 BOOKING Closed ⚪ All Program YouTube and Facbook Live
PRASADAM GORAKSHA EDUCATION SCHEDULE UPCOMING DONATE LIVE PROGRAM

home-image

- प. पू. स्वामीजी
home-image

             अनादिअनंत परमदयाधन परमेश्वराचे प्रत्येक विधान हे मंगलमय आहे कारण तो स्वयं मंगलस्वरूप आहे अशा प्रकारचा उल्लेख स्वयं शास्त्र करतात मंगलं भगवान विष्णु… मंगलं गरुडध्वज… अथवा म“लायतनो हरि…› किंवा म“लानांच म“लम्‌› एतत्‌ मंगलस्वरुप परमात्म्याने केलेली म मानवसृष्टी सुध्दा मंगलमय होय

             ईश्वरदत्त मानवजीवन अतिशय अमूल्य असे आहे व्यŠतला जीवनाचे मूल्य सद्‌विचारवंताच्या सन्निकटतेमधून प्राप्त होते थोर महापुरुषाचे सानिध्य मनुष्याच्या अंधकारमय जीवनाला प्रकाशमय बनविते प्रकाशमयताच जीवनाची अनमोल पुंजी आहे जीवन प्रकाशमय होणे हेच जीवनाचे सार रहस्य आहे त्या रहस्याप्रत पोहचण्याकरिता प्रत्येकाला एका श्रेष्ठ मार्गदर्शकाची नितांत गरज असते तो मार्गदर्शक म्हणजे ज्ञानदाता सद्‌गुरू अर्थात आचार्य होय आपण जर आचार्य चरणचंचरिक झालो तर तेच आपणांस प्रथम मार्गदर्शन करतील आपल्या ठरवलेल्या मार्गाला दाखवतील योग्य मार्गाचे दिग्दर्शन करतील व स्पष्ट सांगतील

असतो मा सद्‌गमय । तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्युर्मा अमृतं गमय । इति ।।

                   हे ज्ञानमार्ग पथिक साधका ! अरे ! तू असताकडे न जाता सत्याकडे जा तसेच अंधकाराकडे अर्थात घोर अशा अंधकारस्वरुप अज्ञानाकडे न जाता प्रकाशाकडे जा कारण प्रकाश तुझे जीवन आहे तुझी चेतना आहे तू स्वयं प्रकाश आहेस प्रकाशच तुझ्या दिव्य जीवनाचा स्त्रोत आहे परंतु तुझे दिव्यत्त्व अंधकारात दडलेले आहे, ते प्रकाशानेच प्रत्ययाला येईल अरे सज्जन पुरुषा ! किती दिवस तू या अनादिअज्ञानमय कष्टप्रद प्रपंचाचा संग करणार? त्या मध्येच तू किती वेळा विनाष्ट झाला व उदायास आला म्हणून तात्त्विक विचाराच्या दृष्टीकोणातून बघ, दृष्टि उघड, प्रकाश मिळेल अन्यथा बहुमूल्य जीवनास तू कायमचा मुकशील कारण ख्ऐसो जनम नहीं बारंबार हे पवित्र जीवन तुला एक अनमोल रत्नस्वरुप मिळाले आहे त्याची जाणीव ठेव, कदर कर, तू तर चिरंतन सुखसाम्राज्याचा उत्तम अधिकारी आहेस परंतु अशा प्रकारच्या ज्ञानाविषयी तू अनभिज्ञ आहेस ती अनभिज्ञता काढून टाकावयाची झाल्यास तुला तत्त्वज्ञात्या आचार्याला शरणापन्न व्हावे लागेल आत्मियतेने त्यांची शुश्रुषा करावी लागेल त्यावेळी तुला आत्मप्रकाशाची अनुभूति मिळेल चित्ताला लागलेली अंधकाराची मलीनता स्वच्छ धुऊन निघेल व जीवन प्रकाशरुपाने म्हणजे ज्ञानरुपाने परिवर्तीत होईल प्रकाशमय परिवर्तनच तुझ्या जीवनाचे परमसाध्य होय वरील निष्कर्षावरुन हेच निष्पन्न झाले की, आचार्य अशाप्रकारे साधकाचे पथदर्शक होतात त्यांच्या बोधातूनच साधकाला स्वत:ची हरवलेली दृष्टी पुनश्च प्राप्त होते

               साधुबोध हाच कल्याणमय जीवनाचे पावनसूत्र होय तो बोध मिळविण्याकरिता साधकाने सतत प्रयत्नशिल राहावयास पाहिजे कारण जो पर्यंत ज्ञान मिळत नाही तो पर्यंत आपण अज्ञानाच्या घोर निद्रेतच राहणार जीवनात बोध मिळणे हीच खरी जागृती आहे परंतु जागृतीचा बोध सद्‌गुरुशिवाय मिळत नाही सद्‌गुरु परमभाग्याशिवाय मिळत नाहीत संत श्री तुकाराम महाराजांनी याविषयी स्पष्ट उल्लेख केला आहे

पुण्य फळले बहुतां दिवसा ।
भाग्य उदयाचा ठसा ।।
झालो सन्मुख तो कैसा ।
संतचरण पावलो ।।

संत तुकाराम महाराज

                 यामधून हाच सारांश अनंत दृष्टिगोचर होतो की, अनंत जन्मातून केलेले पुण्य फळाला आल्यानंतर संत मिळतात असे थोर अधिकारी सद्‌गुरू मिळाल्यास ते प्रथम आपणांस जागृत करतात अर्थात अज्ञानरुप घोर निद्रेतून उठण्यास सांगतात

उतिष्ठत्‌ जागृत प्राप्य वरान्निबोधत्‌ ।

हे परमामृतरसपानपिपासु उठ अज्ञानरुप निद्रेतून उठ जागा हो अर्थात कर्तव्यपरायण हो म्हणजे वेदांत शास्त्राचे चिंतन दिनरजनीकर आणि श्रेष्ठ ज्ञानीपुरुषाला शरण जाऊन सत्संगाद्‌वारे आत्मत्त्वाला चांगल्याप्रकारे जाणून घे या उपनिषद वाŠयात उतिष्ठत शब्द फार मूल्यवान आहे याच अनुषंगाने त्याचे चिंतन खाली दिल्या जात आहे

              उतिष्ठत्‌ हा ऋषिंचा दिव्य संदेश आहे ते संपूर्ण मानव जातीला उठण्याचा दिव्य संदेश देतात कारण उठल्याशिवाय मिळणार नाही म्हणून उतिष्ठत्‌ शब्दाने सूचविले ज्याप्रमाणे रात्री निवांत झोपलेल्या बालकाला माता त्याच्या हिताकरिता ब्रम्हमूहर्ति उठण्यास सांगते त्याप्रमाणे सद्‌गुरू माऊली साधकरुप किंवा शिष्यरुप बालकास उठावयास सांगते मोहान्धकारामुळे जीव अज्ञानरुप संसाराच्या गर्तेत पडलेले आहेत स्वत: उठणे शŠय नाही

पुण्य फळले बहुतां दिवसा ।
भाग्य उदयाचा ठसा ।।
झालो सन्मुख तो कैसा ।
संतचरण पावलो ।।

संत तुकाराम महाराज

         यामधून हाच सारांश अनंत दृष्टिगोचर होतो की, अनंत जन्मातून केलेले पुण्य फळाला आल्यानंतर संत मिळतात असे थोर अधिकारी सद्‌गुरू मिळाल्यास ते प्रथम आपणांस जागृत करतात अर्थात अज्ञानरुप घोर निद्रेतून उठण्यास सांगतात

उतिष्ठत्‌ जागृत प्राप्य वरान्निबोधत्‌ ।

हे परमामृतरसपानपिपासु उठ अज्ञानरुप निद्रेतून उठ जागा हो अर्थात कर्तव्यपरायण हो म्हणजे वेदांत शास्त्राचे चिंतन दिनरजनीकर आणि श्रेष्ठ ज्ञानीपुरुषाला शरण जाऊन सत्संगाद्‌वारे आत्मत्त्वाला चांगल्याप्रकारे जाणून घे या उपनिषद वाŠयात उतिष्ठत शब्द फार मूल्यवान आहे याच अनुषंगाने त्याचे चिंतन खाली दिल्या जात आहे

         उतिष्ठत्‌ हा ऋषिंचा दिव्य संदेश आहे ते संपूर्ण मानव जातीला उठण्याचा दिव्य संदेश देतात कारण उठल्याशिवाय मिळणार नाही म्हणून उतिष्ठत्‌ शब्दाने सूचविले ज्याप्रमाणे रात्री निवांत झोपलेल्या बालकाला माता त्याच्या हिताकरिता ब्रम्हमूहर्ति उठण्यास सांगते त्याप्रमाणे सद्‌गुरू माऊली साधकरुप किंवा शिष्यरुप बालकास उठावयास सांगते मोहान्धकारामुळे जीव अज्ञानरुप संसाराच्या गर्तेत पडलेले आहेत स्वत: उठणे शŠय नाही म्हणून कृपाळू ऋषीजन उठवितात अहो । उठणे म्हणजेच खरी जागृती संत वाड:मयातून आपणास ठिकठिकाणी जागृतीचा उपदेश भिन्नभिन्न शब्दांतून पाहावयास मिळतो

उठा जागे व्हारे आता ।
स्मरण करा पंढरीनाथा ।
भावे चरणी ठेवा माथा ।
चुकवा व्यथा जन्माच्या ।।

संत तुकाराम महाराज

उठा उठा जागा पाठी भय आले मोठे ।
पंढरीवाचुनी दुजा ठाव नाही कोठे ।।

तद्वतच एका पाश्चात्य विचारकाचा जागृतीचा एक संदेश असा की अपव श्रळर्शीं ळप रलींळेप श्ररर्लेीी ! ारज्ञश ींहळपस रलीीं ढहश ळीूिं लरीींळपस रश्रश्र ीशश्रष रीळवश लेपींशापळपस