पूज्यपाद श्री श्री १००८ आचार्य स्वामी श्री हरि चैतन्यजी महाराज
卐 जीवनदर्शन 卐
महाराष्ट्रातील एका खेड्यात पारमार्थिक व ईश्वर भत कुटुंबात स्वामीजींचा जन्म झाला केवळ ९ वर्षे वय असतांनाच कीर्तनाला जाऊन धृवबाळाची कथा ऐकून अनुष्ठान करणारे स्वामीजी यांनी १९७५ मध्ये दिल्ली येथील वेिशनाथ संस्कृत महाविद्यालयात शास्त्री ही पदवी विशेष प्राविण्याने प्राप्त केली वाराणसी येथील सम्पूर्णानंद वेिशविद्यालयातून दर्शन शास्त्रातील एम्ए ही पदवी प्राप्त केली
भारतीय दर्शन शास्त्राचा, संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी ऋषीकेश येथील कैलास आश्रमात प्रवेश घेऊन तेथे तप भूत अध्ययन करून न्याय व्याकरण मिमांसा छंद निरुत व ज्योतिष शास्त्राचे अध्ययन केले बालपणीच आचार्य डोंगरेजी महाराज व रामसुखदासजी महाराज या सारख्या थोर संतांचा सत्संग सहवास व त्यांचे आशिर्वाद प्राप्त झालेले स्वामीजी १९८५ मध्ये आेंकारेेशरला पपू रामानंदजी सरस्वती यांच्या सान्निध्यात राहिले त्यांच्याकडून दीक्षा घेऊन शिष्यत्त्व पत्करले सखोल व्यासंग, भावविभोर समर्पणता व चैतन्यपूर्ण कार्य तत्परता यामुळेच त्यांना सद्गुरूकडून हरिचैतन्य हे नामाभिधान मिळाले
महत् प्रयत्नाने मिळालेले ज्ञान मुत हस्ताने वाटण्यासाठी गुरू आज्ञेने त्यांनी ७ वर्ष २० दिवस निरागस वृत्तीने पायी भारत भ्रमण सुरू केले सातपुड्याच्या निसर्गरम्य कुशित कठोर तपश्चर्या करून भगवान श्रीकृष्णाची कृपा संपादन केली भारत भ्रमण करतांना त्यांना आपल्या देशातील लोकांचे जीवन, त्यांची संस्कृती कळाली भ्रमण करीत विदर्भ प्रांतात आले बुलडाणा जिल्ह्यातील डोंगरशेवली येथील श्री क्षेत्र सोमनाथ महाराजांचे मंदिरात १९९० मध्ये स्वामीजींचे आगमन झाले या मंदिराच्या ‘ जवळच असलेल्या ज्ञानगंगा नदीच्या किनाऱ्यावर ४० दिवसाचे अनुष्ठान केले हे अनुष्ठानाचे ठिकाणच पुढे स्वामीजींनी श्री क्षेत्र काशिकुंड व नळकुंड म्हणून प्रसिध्दीस आणले अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते
***

